भ्रमंती
मन विहंग माझे भिरभिरते
कधी फुलांभोवती, फुलपाखरे धुंद फिरी
कधी उंच आकाशी, गगनचुंबी घेत भरारी
मन सुसाट माझे धावतसे,
स्वच्छन्द मृग जसा वनातसे
मन पतंग माझे उडतसे,
वाऱ्यापरी डोलतसे
मन भुजंग माझे, मग्न कमलकोशी,
मधु पान करे